एमआयडीसी पोलिसांची चक्री जुगार अड्ड्यावर धाड

Foto
पैठण, (प्रतिनिधी)  संत एकनाथ सहकारी साखर कारखाना समोर मुदलवाडी येथे एका पत्राच्या शेडमध्ये सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या चक्री नावाच्या अड्ड्यावर प्रकाश काकासाहेब जाधव राहणार कारकीन हल्ली मुक्काम गणेश नगर पिंपळवाडी पैठण तालुका पैठण यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २३० / २०२६ कलम १२ अ मुजुका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल यांच्या फिर्यादीवरून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या मार्गदर्शकाखाली पोलीस अमलदार रहाटवाड हे करीत आहे. जुगार एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकून रोख रक्कम अकराशे सह जवळपास ५२ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.